Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशVinod Upadhyay Encounter | 1 लाखाचं बक्षीस असलेल्या गोरखपूरच्या कुख्यात गुंडाच एन्काऊंटर,...

Vinod Upadhyay Encounter | 1 लाखाचं बक्षीस असलेल्या गोरखपूरच्या कुख्यात गुंडाच एन्काऊंटर, हत्येसह 35 गुन्हे होते दाखल! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

1 लाखाचं बक्षीस असलेल्या गोरखपूरच्या कुख्यात गुंडाच एन्काऊंटर, हत्येसह 35 गुन्हे होते दाखल!

उत्तरप्रदेशच्या सुलतानपूरमध्ये एसटीएफने मोठा माफिया आणि शार्प शूटर विनोद कुमार उपाध्यायला चकमकीत ठार केले आहे. गोरखपूर पोलिसांनी विनोद कुमार उपाध्याय यांच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील कुख्यात गुन्हेगार विनोद  कुमा उपाध्यायला  (Vinod Upadhyay) उत्तर प्रदेश एसटीएफने (Uttar Pradesh STF) सुलतानपूरमध्ये चकमकीत (Encounter) ठार केले. विनोदने स्वतःची संघटित टोळी तयार करून गोरखपूर, बस्ती, संत कबीर नगर, लखनौ येथे अनेक खळबळजनक हत्याकांड घडवून आणले होते.  त्याच्यावर एक, दोन नव्हे तर तब्बल ३५ गुन्हे दाखल होते, पण त्याला एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नव्हती.

हे सुद्धा वाचा

एसटीएफची कारवाई

एसटीएफ मुख्यालयाचे डेप्युटी एसपी दीपक कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने उपाध्यायचा एन्काउंटर केला. विनोद उपाध्याय यांच्यावर गोरखपूर, बस्ती आणि संत कबीर नगरमध्येशुक्रवारी पहाटे एसटीएफच्या पथकाने त्याला घेरले असता त्याने पळून जाण्यासाठी गोळीबार सुरू केला. त्याने एसटीएफ टीमवर अनेक राऊंड गोळीबार केला, त्यानंतर एसटीएफने त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळ्या घातल्या. गोळी लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments