Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाIND vs SA 2nd Test Day 2 : भारतासमाेर विजयासाठी ७९ धावांचे...

IND vs SA 2nd Test Day 2 : भारतासमाेर विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य, द.आफ्रिकेला दुसर्‍या डावात १७६ धावांत गुंडाळले | पुढारी

IND vs SA 2nd Test Day 2 : भारतासमाेर विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य, द.आफ्रिकेला दुसर्‍या डावात १७६ धावांत गुंडाळले | पुढारी

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. सामन्याचा  आज (दि. ४ जानेवारी) दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला होता. आज  दुसऱ्या डावात भारताने द. आफ्रिका १७६ धावांत गुंडाळले आहे. आता टीम इंडियाला या सामन्‍यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ७९ धावांचे लक्ष्य आहे. द. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मार्करमने  शतकी खेळी केली.  त्याच्या १०७ धावांच्‍या खेळीमुळे द. आफ्रिकेने १७६ धावांपर्यंत मजल मारली.  दुसर्‍या डावात भारताचा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह याने 6, मुकेश कुमार २, माेहम्‍मद सिराज आणि मुकेश कुमारने प्रत्‍येकी १ विकेट घेतली. ( IND vs SA 2nd Test Day 2 )

IND vs SA 2nd Test Day 2 : बुमराहचा भेदक मारा

आज दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या दिवसाच्या ६२/३ या धावसंख्येपुढे दुसऱ्या डावात खेळण्‍यास सुरुवात केली.  पहिल्‍याच्‍या षटकात भारताला यश मिळाले. बुमराहच्‍या स्‍विंगने बेडिंगहॅमला चकवा दिला त्‍याने यष्‍टीरक्षक केएल राहुलकडे सोपा झेल दिला. त्‍याने १२ चेंडूत १२ धावा केल्‍या. दुसर्‍या डावात दक्षिण आफ्रिकेने ४ गडी गमावत ६६ धावा केल्‍या आहेत. भारताकडे ३२ धावांची आघाडी आहे. बुमराहने दक्षिण आफ्रिकेला सलग दुसरा धक्‍का दिला. त्‍याने  व्हेरेनेला सीराज करवी झेलबाद केले. व्‍हेरेने याने ७ चेंडूत ९ धावा केल्‍या. निम्‍मा संघ तंबूत गेल्‍यानंतर मार्करम आणि मार्को जॅनसेन यांनी सावध खेळीचा प्रयत्‍न केला. मात्र ११ धावांवर खेळणार्‍या मार्कोला बुमराहने झेलबाद केले. यानंतर बुमराहने ३ धावांवर खेळणार्‍या केशव महाराजला यशस्‍वी जैस्‍वाल करवी झेलबाद करत दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्‍का दिला.

मार्करमचे झुंझार शतक

दक्षिण आफ्रिकेच्‍या मार्करमने झुंझार शतकी खेळी केली. दुसऱ्या डावाच्या ३२ व्या षटकात सिराजने त्‍याला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. त्‍याने १०६ धावांची खेळी केली. यानंतर दोन धावांवर खेळणार्‍या कागिसो रबाडाला प्रसिद्‍ध कृष्‍णाने रोहित शर्माकरवी झेलबाद केले. ८ धावांवर खेळणार्‍या एनगिडीला बुमाहने जैस्‍वाल करवी झेलबाद करत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव संपुष्‍टात आणला.
दुसर्‍या डावात भारताचा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह याने ६, मुकेश कुमार २, माेहम्‍मद सिराज आणि मुकेश कुमारने प्रत्‍येकी १ विकेट घेतली.

 पहिल्याच दिवशी तब्‍बल 23 विकेट

पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन संघाचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अचूक मारा करत सहा विकेट घेतल्या. त्याच्यासह मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सावध सुरूवात केली. यानंतर रोहित शर्मा 39 धावा करून बाद झाला. तर विराटने सर्वाधिक 46 तर गिलने 36 धावांचे योगदान दिले. यांच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज 10 हून अधिक धावा करू शकला नाही. यामुळे आफिकन संघाने भारताला 153 धावांवर सर्वबाद केले. ( IND vs SA 2nd Test Day 2)

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 62 अशी झाली. एडन मार्कराम 36 आणि डेव्हिड बेडिंगहॅम सात धावांसह खेळत आहे. भारताकडे अजूनही 36 धावांची आघाडी असून दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सात विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या डावात भारताकडून मुकेश कुमारने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. डीन एल्गर 12 धावा करून बाद झाला. टोनी जॉर्जी आणि ट्रिस्टन स्टब्स प्रत्येकी एक धाव काढून बाद झाले.

भारताने शेवटच्या सहा विकेट्स एकही धाव न करता गमावल्या. एकवेळ भारताची धावसंख्या 4 बाद 153 होती. विराट कोहली आणि लोकेश राहुल फलंदाजी करत होते. मात्र, राहुल बाद झाल्यानंतर शेवटच्या फळीतील फलंदाजांनी मैदानावर केवळ हजेरी लावली आणि ते माघारी परतले. भारताचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने 39 धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने 36 आणि विराट कोहलीने सर्वाधिक 46 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुलला खाते उघडता आले. त्याने आठ धावा केल्या.

पहिल्‍या डावात भारताने 11 चेंडूत 6 विकेट गमावल्या

भारताने शेवटच्या 6 विकेट एकही धाव न करता गमावल्या. 153 च्या स्कोअरवर टीमने 4 विकेट गमावल्या होत्या, या स्कोअरवर टीम ऑलआऊट झाली होती. 34व्या षटकातील पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर संघाने विकेट गमावल्या. त्यानंतर 35व्या षटकातही भारताने दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट गमावल्या. लुंगी एनगिडीने 34व्या षटकात तीन, तर कागिसो रबाडाने 35व्या षटकात 2 बळी घेण्याची किमया केली. यामध्ये यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार (नाबाद) यांना खाते उघडता आले नाही.

हेही वाचा :



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments