महुआ मोइत्रा अर्थसंकल्पीय अधिवेशनास मुकणार, निलंबनास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

0
14
महुआ मोइत्रा अर्थसंकल्पीय अधिवेशनास मुकणार, निलंबनास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार


नवी दिल्ली – कॅश-फॉर-क्वेरी प्रकरणात लोकसभा सदस्यता हिरावून घेतल्याच्या विरोधात  टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. याप्रकरणी आज  सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने लोकसभा महासचिवांकडे याप्रकरणी दोन आठवड्याच्या आत उत्तर मागवले आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी ११ मार्च रोजी होणार आहे. दरम्यान न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी म्हटले की, महुआ सध्या लोकसभेच्या कार्यवाहीत सहभाग घेऊ शकणार नाहीत. 



Source link