
नाशिकमधील सिन्नरच्या माळेगाव औद्यागिक वसाहतीतील हिंदुस्तान ग्लास लिमिटेड या कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीत काचा तयार केल्या जातात. स्फोटानंतर सिन्नर एमआयडीसीसह सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.







