
Wrestling Federation of India: भारतीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाला बरखास्त केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला रामराम करत निवृत्ती घेतली. तसेच यानंतर बजरंग पुनियाने देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्म पुरस्कार परत केला होता. त्यानंतर सरकारला जाग आली आहे. सरकारने कुस्ती महासंघ बरखास्त करत संजय सिंह यांनी घेतलेले सर्व निर्णयही स्थगित केले आहेत. क्रीडा मंत्रालयाच्या या कारवाईवर बजरंग पुनिया म्हणाले की, मला अद्याप याबद्दल माहिती नाही. ते म्हणाले की, हा निर्णय घेतला असेल तर ते बरोबर आहे.







