Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशParliament Attack | संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी मोठी अपडेट, सहाव्या आरोपीचं दिल्ली पोलिसांसमोर...

Parliament Attack | संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी मोठी अपडेट, सहाव्या आरोपीचं दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण! | Navarashtra (नवराष्ट्र)

Parliament Attack | संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी मोठी अपडेट, सहाव्या आरोपीचं दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी मोठी अपडेट, सहाव्या आरोपीचं दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण!

सागर, मनोरंजन, अमोल, नीलम आणि विशालला पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर सहावा आरोपी ललित हा फरार होता. त्याला शोधण्यसाठी पोलिसांची एक टिम त्याच्या मागावर होती अखेर त्याने आत्मसमर्पण केले आहे.

नवी दिल्ली: संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी (Parliament Security Breach) मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. आता प्रकरणातील सहावा फरार आरोपी ललित झा याने आत्मसमर्पण केले आहे. ललितने दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दुसरीकडे, लोकसभेत हे कृत्य करणाऱ्या इतर चार आरोपींची  पटियाला कोर्टाने सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. चारही आरोपींवर दहशतवादविरोधी कायदा आणि UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

संसदेत काय घडलं होतं?

 

बुधवारी लोकसभेत सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि स्प्रे फवारून घोषणाबाजी केली. त्याचवेळी संसद भवनाबाहेर अमोल शिंदे आणि नीलम यांनीही स्प्रे फवारत घोषणाबाजी केली. ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या. या घटनेनंतर सगळीकडे एकच गोंधळ उडाला. सागर, मनोरंजन, अमोल, नीलम आणि विशालला पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर सहावा आरोपी ललित हा फरार होता. त्याला शोधण्यसाठी पोलिसांची एक टिम त्याच्या मागावर होती अखेर त्याने आत्मसमर्पण केले आहे.

सहा जणांनी या घटनेचा कट रचला

संसद घुसखोरी प्रकरणात सहापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सहा जणांनी या घटनेचा कट रचल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. संसदेत घुसलेले हे सहा जण दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले. संसदेत येण्यापूर्वी त्यांनी रेकी केली होती.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments