
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी कोणाला समर्थन द्याचे ही भूमिका स्पष्ट करत अजित पवार गटाला समर्थन दिले. मलिक अधिवेशनातसत्ताधारी बाकावर बसल्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. नवाब मलिक यांच्यावर भाजपाने देशद्रोहासह अनेक आरोप केले होते.याप्रकरणी ते तुरुंगातही जाऊन आले आहेत. ते सध्या वैद्यकीय कारणांमुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. अशातच ते आज भाजपा, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबर सत्ताधारी बाकावर बसले.



