
हवामानविभागाकडून तामिळनाडू, चेन्नई आणि ओडीसा येथील नागरिक आणि मच्छमारांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे उद्भवणारा संभाव्य धोका लक्षात घेता तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि चेन्नईमध्ये आज शाळा बंद ठेवण्यात आली आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ गेल्या सहा तासांमध्ये १३ किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकलं आहे. हे चक्रीवादळ काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अक्षांश १२.८°N आणि रेखांश ८१.६°E जवळ केंद्रीत झाले होते. हे क्षेत्र पुद्दुचेरीपासून सुमारे २१० किमी पूर्व-ईशान्य, चेन्नईच्या १५० किमी पूर्व-आग्नेय, नेल्लोरच्या २५० किमी आग्नेय, बापटलापासून ३६० किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि मछलीपट्टनमच्या ३८० किमी दक्षिण-पूर्वेस आहे.







