Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशChina New Disease | चीनच्या नव्या आजारानं वाढवली अमेरिकेची चिंता! चीनवर...

China New Disease | चीनच्या नव्या आजारानं वाढवली अमेरिकेची चिंता! चीनवर पुन्हा प्रवास बंदी घालण्याची अमेरिकेत मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)

China New Disease  | चीनच्या नव्या आजारानं वाढवली अमेरिकेची चिंता! चीनवर पुन्हा प्रवास बंदी घालण्याची अमेरिकेत मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

चीनच्या नव्या आजारानं वाढवली अमेरिकेची चिंता! चीनवर पुन्हा प्रवास बंदी घालण्याची अमेरिकेत मागणी

बिडेन प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘या नवीन आजारामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत अधिक माहिती मिळेपर्यंत अमेरिका आणि चीनदरम्यानचा प्रवास तात्काळ थांबवावा.’

चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे आजार आणि न्यूमोनियाच्या (pneumonia) वाढत्या प्रकरणांनी अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं आहे. चीनमध्ये नव्याने आलेल्या या आजाराने अमेरिकेची चिंता वाढवली आहे. आता अमेरिकतून चीनमधील प्रवासावर बंदी घालण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. मार्को रुबिओ यांच्या नेतृत्वाखाली पाच रिपब्लिकन सिनेटर्सनी शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाला याबाबत पत्र लिहिले. रुबिओ हे सिनेट इंटेलिजन्स समितीचे सर्वोच्च रिपब्लिकन सदस्य आहेत. त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘या नवीन आजारामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत अधिक माहिती मिळेपर्यंत आम्ही अमेरिका आणि चीनदरम्यानच्या प्रवासावर तात्काळ बंदी घालावी.’

हे सुद्धा वाचा

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनला मुलांमध्ये पसरणाऱ्या या आजाराबाबत अधिक माहिती देण्याचे आवाहन केले होते. डब्ल्यूएचओने नंतर सांगितले की आरोग्य अधिकार्‍यांना कोणतेही असामान्य किंवा नवीन रोगजनक आढळले नाहीत. दुसरीकडे, तैवाननेही आपल्या नागरिकांना याबाबत सल्ला दिला आहे. त्यात म्हटले आहे की वृद्ध, तरुण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांनी चीनचा प्रवास टाळणे आवश्यक आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सचे म्हणणे आहे की व्हाईट हाऊस आणि अमेरिकेतील चिनी दूतावासाकडून प्रवासी बंदीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments