
पुढे अक्षय म्हणाला की, “सगळी जमवाजमव, कागदपत्र, लोन, तयारी आणि खूप मोठी, किचकट पण हवीहवीशी प्रक्रिया… म्हाडाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद! ही सगळी प्रक्रिया पार पाडताना तुमची खूप मदत मिळाली आणि तुमच्यातला सकारात्मक प्रतिसाद खरोखर कौतुकास्पद आहे. तुमच्या साथीमुळे घराचा आनंद द्विगुणित झाला. तर, आज माझ्या घराची चावी हातात आली! या वर्षाची सुरुवात आणि शेवट दोन्ही ‘विजेता’ अशी होते आहे, ही मालिका या पुढे अशीच सदैव सुरू राहू दे. तर अश्या प्रकारे, मुंबईत स्वतःच घर झाले!”








