‘संडासची दुर्गंधी येऊ नये म्हणून…’ बोगद्यात १७ दिवस अडकलेल्या मजुराचा अंगावर काटा आणणारा अनुभव

0
20
‘संडासची दुर्गंधी येऊ नये म्हणून…’ बोगद्यात १७ दिवस अडकलेल्या मजुराचा अंगावर काटा आणणारा अनुभव


१८ तास ऑक्सिजनशिवाय

बोगद्याची लांबी २ किमी असल्यानं त्यात सुरूवातीला पुरेसा ऑक्सिजन मिळत होता, असं धिरेन याने सांगितलं. त्यामुळं मजुरांना सुरुवातीला श्वासोच्छवासात कोणतीही अडचण आली नाही. तथापि, नंतर मात्र काहींना श्वास घेताना त्रास होऊ लागला. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना तब्बल १८ तास ऑक्सिजन पुरवठा नव्हता, असं धिरेन याने सांगितलं. त्यानंतर बोगद्यामध्ये एक छोटी पाइपलाइन टाकण्यात आली. त्यातून मजुरांना खाण्यासाठी शिजलेला भात, काजू, मनुका, पाणी, ऑक्सिजन, औषधं, प्रकाश आणि वॉकी-टॉकी पाठवण्यात आली. मजुरांनी सुरुवातीचे १० दिवस उकडलेला भात आणि सुका मेवा खाल्ला होता. नंतर अधिकाऱ्यांनी ६ इंच पाइपद्वारे डाळ, तांदूळ आणि चपाती पाठवली, असं धिरेन याने सांगितलं. आपण जिवंत बाहेर येणार नाहीत असं बोगद्याच्या आत अडकलेल्या मजुरांना कधीही वाटलं नाही, असं धिरेन म्हणाला.



Source link