Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक.. दारू पिऊन रस्त्यात गोंधळ घालणाऱ्यांना रोखलं; मद्यपी तरुणांकडून माजी सैनिकाची हत्या

धक्कादायक.. दारू पिऊन रस्त्यात गोंधळ घालणाऱ्यांना रोखलं; मद्यपी तरुणांकडून माजी सैनिकाची हत्या

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी चौबे हे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास म्हसरुळ-आडगाव लिंक रोडवरून सहकुटुंब कारने जात होते. त्यावेळी सुरभी कंपनीसमोर दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत एकमेकांशी भांडण करत गोंधळ घालत होते. त्यांच्या वादामुळे रस्त्यातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. चौबे यांनी कारमधून उतरून दोघांना रस्त्यातून बाजुला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील एकाने चौबे यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार केला. या घटनेत चौबे गंभीर जखमी झाले. या घटनेची सूचना मिळताच म्हसरुळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments