
जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता. माझा उद्देश वेगळा होता. त्याला जाणीवपूर्वक जातीय रंग दिला गेला. त्या शब्दाचा गैरसमज झाला. काही लोकांनी त्या शब्दाचा वेगळा अर्थ जोडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता. कारण मी कधीही जीवनात जातीयवाद केला नाही. माझ्या गोदापट्ट्यातील लोकांनाही माहिती आहे की, मी कधीही जातीवाद केला नाही. मराठा आरक्षणावरून आमचं ध्येय, मन हटणार नाही. आम्ही आमच्या ध्येयावरून विचलित होणार नाही. परंतु, काही लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.






