Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi | पंतप्रधान मोदींनी तिरुपती बालाजी चरणी लीन! पूजा करत...

PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींनी तिरुपती बालाजी चरणी लीन! पूजा करत भगवान व्यंकटेश्वराचे घेतलं दर्शन | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पंतप्रधान मोदींनी तिरुपती बालाजी चरणी लीन! पूजा करत भगवान व्यंकटेश्वराचे घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. रविवारी तिरुपतीला पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी सोमवारी सकाळी तिरुमला मंदिरातील श्री व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजाही केली.

सध्या तेलंगणात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्या 30 नोव्हेंबरला तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभुमीवर नेत्यांनी सभा घेण्याचा धडका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तेलंगणातील अनेक जाहीर सभांना संबोधित केलं. यानंतर त्यांनी रविवारी संध्याकाळी तिरुपतीला देवस्थानला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिरुमला सोमवारी सकाळी येथील श्री व्यंकटेश्वर मंदिराला (Tirupati Balaji) भेट देत पूर्ण विधीपूर्वक प्रार्थना केली. यावेळी पीएम मोदी पारंपरिक पूजेच्या पोशाख परिधान केला होता.

हे सुद्धा वाचा

रविवारी संध्याकाळी ७.४० वाजता पंतप्रधान तिरुपतीजवळील रेनिगुंटा विमानतळावर उतरले. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर आज सकाळी त्यांनी तिरुपतीला देवस्थानला भेट दिली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments