PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींवर सरकारची कारवाई, 7 पोलिस बडतर्फ! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींवर सरकारची कारवाई, 7 पोलिस बडतर्फ! | Navarashtra (नवराष्ट्र)


पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींवर सरकारची कारवाई, 7 पोलिस बडतर्फ!

पंजाबमध्ये सरकारने पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक केल्याप्रकरणी सात पंजाब बडतर्फ केले आहे. 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी पंजाबला भेट दिली.

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सरकारने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एसपी गुरविंदर सिंग संगासह 7 पोलिस कर्मचाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. पंजाबच्या भगवंत मान सरकारने हा निर्णय घेतला आहे. 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला घेराव घातला होता.

हे सुद्धा वाचा

काय होतं नेमकं प्रकरण?

पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी ५ जानेवारीला पंजाब दौऱ्यावर होते. निवडणुकीच्या काळात ते सभा घेणार होते. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला घेराव घातल्याने पंतप्रधान मोदींचा ताफा 20 मिनिटे उड्डाणपुलावर थांबवण्यात आला. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे.






Source link