
[ad_1]
उसाच्या मागील हंगामातील ४०० रुपये आणि चालू हंगामातील ऊसाला ३५०० रुपये एकरकमी पहिला हप्ता या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे गेल्या २२ दिवसापासून आंदोलन सुरू केल्याने ऊसतोड ठप्प असून कारखान्याचे गाळप सुरू झालेले नाही. ऊसदरासंदर्भात काल मुंबईत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक झाली मात्र या बैठकीत कोणताच निर्णय न झाल्याने संघटनेने आज चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सकाळी अकरा वाजल्यापासून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे.
राजू शेट्टी यांनी ४०० रुपयांचा आग्रह सोडत टनास किमान १०० रुपये घेतल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही अशी भूमिका घेतली आणि तीन पाऊले मागे घेतली. एवढी रक्कम देण्याची कारखान्यांची तयारी असल्याचे जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत दर्शवली. मात्र सत्ताधारी काही नेते मागील हंगामातील काय द्यायचे नाही, चालू हंगामातील पुढचे पुढे बघू अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे कारखानदार दबकून होते परंतू आता त्यांनी शंभर रुपये देवून कोंडी फोडली आहे.
[ad_2]
Source link
