Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशCrime News | प्रेम नाकारल्यानं सनकी तरुणाचं टोकाचं पाऊल, तरुणीच्या कुटुंबांतील 6...

Crime News | प्रेम नाकारल्यानं सनकी तरुणाचं टोकाचं पाऊल, तरुणीच्या कुटुंबांतील 6 सदस्यांवर झाडल्या गोळ्या, 2 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

Crime News | प्रेम नाकारल्यानं सनकी तरुणाचं टोकाचं पाऊल, तरुणीच्या कुटुंबांतील 6 सदस्यांवर झाडल्या गोळ्या, 2 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

प्रेम नाकारल्यानं सनकी तरुणाचं टोकाचं पाऊल, तरुणीच्या कुटुंबांतील 6 सदस्यांवर  झाडल्या गोळ्या, 2 जणांचा मृत्यू!

आशिष चौधरी नावाच्या तरुणाचे त्याच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होते आणि तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याचा राग आल्याने तरुणाने मुलीच्या कुटुंबावर गोळीबार केला.

बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे. क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन बंदूक उगारण्याच्या घटना बिहारमध्ये (Bihar Crime News) नेहमीच उघडकीस येतात. आता सध्या छटपुजेसारखा (Chhatpuja) सण सुरु असताना हत्यांकाड घडलं आहे. लग्नाला नकार दिल्यानं एका सनकी तरुणानं तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांवर अंदाधुंद गोळीबार (Man Shot 6 people in family) केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंब बिहारमधील लखीसराय येथे छठघाटावरून पुजा करुन परते येत असताना हे हत्याकांड घडवण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

लखीसराय एसपीच्या म्हणण्यानुसार, आशिष चौधरी नावाच्या तरुणाचे त्याच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याचा राग आल्याने तरुणाने मुलीच्या कुटुंबावर गोळीबार केला.
गोळीबारात जखमी झालेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी सख्खे भाऊ असलेल्या दोन तरुणांना मृत घोषित केले. दोन्ही भावांच्या पत्नी, वडील व बहीण जखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले सध्या हल्लेखोराचा शोध घेण्यात व्यस्त आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments