Maharashtra Weather : राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?

0
17
Maharashtra Weather : राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं पूर्वेकडील वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील हवेतील आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील तीन ते चार दिवसांत सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.



Source link