
रेश्माने हा व्हिडीओ पोस्ट करताच ती ट्रोल होऊ लागली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जोराने किंचाळून ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक म्हणताना दिसत आहे. हे पाहून चाहते चिडले आहेत. अनेकांनी त्यांना किंचाळू नये, असे म्हटले आहे. तर, हा अन्नदेवतेचा अपमान असल्याचे देखील म्हटले आहे. ‘किती किंचाळताय’, ‘आदराने म्हणलं पाहिजे,मस्करी वाटते. निदान सेलिब्रिटीने तरी पाळावं ही अपेक्षा…’, ‘फक्त टिंगल चालली आहे’, ‘अन्न हे पुर्ण ब्रह्म आहे ना मग इतके किंचाळत का प्रार्थना करताय? जरा आदर ठेवा त्या पूर्ण ब्रह्माबद्दल.. इतकी ओव्हर ऍक्टिंग करू नका’, अशा कमेंट्स त्यांनी रेश्मा शिंदे हिच्या पोस्टवर केल्या आहेत.







