
यानंतर कंगना ‘बिग बॉस १७’च्या घरातही गेली होती, जिथे स्पर्धकांनी आपापल्या पद्धतीने तिचे मनोरंजन केले. अंकिता आणि विकी यांनी धमाल डान्स केला. तर, मन्नारा चोप्रा हिने स्वतः कंगनासोबत डान्स केला. शेवटी ऐश्वर्या शर्माची एक झलक देखील पाहायला मिळाली. यामध्ये ती कंगनाचा प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसली होती. हे सर्व पाहून कंगनाच्या आनंदाला पारावार उरला नाही. यावेळी सलमान खानसोबत कंगना रनौतनेही स्पर्धकांची शाळा घेतली.








