Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशIsrael–Hamas War | ...तर जगातील सर्व मुस्लिम युद्धात उतरतील; इराणचा इस्रायलला इशारा...

Israel–Hamas War | …तर जगातील सर्व मुस्लिम युद्धात उतरतील; इराणचा इस्रायलला इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel–Hamas War | …तर जगातील सर्व मुस्लिम युद्धात उतरतील; इराणचा इस्रायलला इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्त्रायल आणि हमास (Israel–Hamas war) यांच्यातील युद्ध आता संपूर्ण इस्लामिक जगासाठी एक समस्या बनत चालले असून, याप्रकरणी सौदी अरेबिया, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया आणि इजिप्तसारख्या देशांनी यापूर्वीच इस्रायलविरोधात आघाडी उघडली आहेत.

तेहराण : इस्त्रायल आणि हमास (Israel–Hamas War) यांच्यातील युद्ध आता संपूर्ण इस्लामिक जगासाठी एक समस्या बनत चालले असून, याप्रकरणी सौदी अरेबिया, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया आणि इजिप्तसारख्या देशांनी यापूर्वीच इस्रायलविरोधात आघाडी उघडली आहेत. आता इराणनेही गाझामधील इस्त्रायलचे युद्ध थांबवले नाहीत तर जगभरातील मुस्लिम या युद्धात उतरतील, असा इशारा दिला आहे.

गाझामधील इस्त्रायलचे हल्ले थांबवले नाहीत तर जगभरातील मुस्लिमांना आणि इराणच्या सैन्याला कोणीही रोखू शकणार नाही, असे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनीने म्हटले आहे. इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलवर देशाला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. इराण हमास आणि हिजबुल्लासारख्या अतिरेकी संघटनांना पडद्याआड मदत करत असल्याचे मानले जाते. इस्त्रायलवर हमासच्या हल्ल्यात इराणने मदत केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. इराणने मात्र याचा इन्कार केला होता.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments