बेस्टच.. उपनगरांतही वातानुकूलित प्रवास घडणार, १९ डबल डेकर AC बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत

0
14
बेस्टच.. उपनगरांतही  वातानुकूलित प्रवास घडणार, १९ डबल डेकर AC बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत


प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाड्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे, तसेच मोबाइल चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात एकूण ३९ वातानुकूलित बस आहेत. त्यापैकी २० गाड्या दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरून धावत आहेत. जुन्या दुमजली बसगाड्या शासन निर्णयानुसार मोडीत काढल्यामुळे कुर्ला, बीकेसी येथील नागरिकांची सध्या गैरसोय होत आहे. लवकरच उपनगरात १० दुमजली वातानुकूलित बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने उर्वरित नऊ बसगाड्या उपनगरात सुरू करण्यात येणार आहेत. 



Source link