Hamas Israel War : जीव धोक्यात घालून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाणार युद्धभूमीत; इस्रायलला देणार भेट

0
13
Hamas Israel War : जीव धोक्यात घालून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाणार युद्धभूमीत; इस्रायलला देणार भेट


दरम्यान, सोमवारी अमेरिकेचा सूर बदललेला होता. त्यांनी पलटी मारत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, हमासचा अंत आवश्यक आहे. दोन राज्यांची निर्मिती यावर उपाय आहे. पॅलेस्टिनी राज्याचा मार्गही मोकळा झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले होते. जो बिडेन म्हणाले की, इस्रायलने गाझावर कब्जा केला तर ही मोठी चूक असेल. तर गाझा पट्टीतून हमासची हकालपट्टी गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले होते. १९६७ च्या युद्धानंतर इस्रायलने गाझा, वेस्ट बँक आणि जेरुसलेमवरही कब्जा केला होता. गाझा आणि वेस्ट बँक नंतर मुक्त करण्यात आले. वेस्ट बॅंकवर इस्रायलचे अजूनही नियंत्रण आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या परवानगीशिवाय गाझाला कोणत्याही जीवनावश्यक वस्तू मिळू शकत नाहीत.



Source link