
सीपीआरओ वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वे प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोक घटनास्थळी मदतकार्यात गुंतले आहेत. अपघाताच्या कारणाबाबत काहीही सांगणे घाईचे आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. घटनास्थळी झोन आणि रेल्वे विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी तळ ठोकून आहेत. सध्या संपूर्ण लक्ष मदत आणि बचाव कार्यावर आहे. रेल्वेचे डबे बाजूला करण्यासाठी आणि या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. जखमींवर येथील जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथक आणि अधिकाऱ्यांसह अपघात निवारण वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. बक्सरहून रात्री ९.२७ वाजता गाडी सुटली आणि रात्री ९.३५ वाजता हा अपघात झाला.






