
आज मुंबईत गांधी जयंतीनिमित्त ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु पदयात्रेत सामील झालेल्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानं पदयात्रेऐवजी कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनची यात्रा करावी लागली. पोलिसांनी कॉंग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्षाच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांची धरपकड केल्याचा आरोप या पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, पूर्णपणे शांततेने होणार असलेल्या या कार्यक्रमाला कोणत्याही कारणाशिवाय पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला असून हा सगळा प्रकार ब्रिटिश राजची आठवण करून देणारा असल्याची भावना मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.





