
काय आहे कथानक?
‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाची कथा २०२० ते २०२२ या दरम्यान घडणारी आहे. कथेची सुरुवात जानेवारी २०२०मध्ये होते. चीनच्या वुहानमधून येत असलेल्या व्हायरसच्या बातमीनंतर आयसीएमआर टीम सतर्क होते. भारतात त्याचा कसा प्रभाव पडेल हे लक्षात घेऊन, त्याच्याशी लढण्याची तयारी सुरू होते. मात्र, शास्त्रज्ञांची टीम मिळून आपल्या देशासाठी लस कशी तयार करते आणि त्या संपूर्ण प्रवासात त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे पाहायला मिळत आहे. या दरम्यान सगळ्या प्रकियेसाठी सध्याच्या सरकारचा पाठिंबा, सर्व वाद, कोरोनाची वाढती प्रकरणे आणि त्यामुळे होणारे लोकांचे मृत्यू या सर्व बाबींना एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.







