
एक्सप्रेस गाड्यांना एलएचबी डबे जोडल्याने रेल्वे गाड्यांच्या डब्याच्या रचनेत थोडा बदल झाला आहे. या संरचनेमुळे एक स्लीपर कोच कमी झाला आहे. तृतीय श्रेणीतील डब्यांमध्ये ९ प्रवाशांची आसनाची संख्या वाढली आहे. सुधारित डब्यांच्या संचनेनुसार वातानुकूलित द्वितीय श्रेणी २ डबे, वातानुकूलित इकॉनॉमी तृतीय श्रेणीचे ६ डबे, ८ शयनयान डबे, सामान्य ३ डबे, जनरेटर कार एक डबा, एसएलआर डबा एक, पॅन्ट्री कार एक असे एकूण २२ डबे असणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.






