
मीडिया रिपोर्टनुसार, रिलीजच्या सुरूवातीला फक्त २०-३० लोकच हा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते. त्याचवेळी, सुरुवातीचे काही दिवस असाच ट्रेंड कायम राहिला, ज्यामुळे चित्रपट फ्लॉप होण्याच्या मार्गावर पोहोचला होता. पण, मग न जाणो असा काही चमत्कार घडला की, काही वेळातच चित्रपटगृहात धडाधड गर्दी वाढू लागली. फ्लॉप ठरल्याचा अंदाज बांधलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करायला सुरुवात केली. दरम्यान, एक वेळ अशी आली की अवघ्या २.५ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल १८ कोटींहून अधिक कमाई केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि बॉलिवूडला मनोज बाजपेयीसारखा स्टार मिळाला.








