Tuesday, October 6, 2026
HomeसाताराSangli Jewelers robbery: सांगली दरोड्याची भीषणता दाखविणारे सीसीटीव्ही फुटेज आले समोर |...

Sangli Jewelers robbery: सांगली दरोड्याची भीषणता दाखविणारे सीसीटीव्ही फुटेज आले समोर | पुढारी

[ad_1]








सांगली: पुढारी वृत्तसेवा: सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्समधील दरोड्याची भीषणता (Sangli Jewelers robbery)  दाखविणारा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत खाली बसून हात बांधले. दरोडेखोर यांनी वापरलेली कार रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसेजवळ आढळून आली आहे. जिल्हा पोलीस गाडी ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्स या सराफी दुकानावर (Sangli Jewelers robbery)  रविवारी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. या दरोड्याची दाहकता दाखवणारा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून गुडघ्यावर बसायला लावले. त्यानंतर त्यांचे हात व तोंड चिकटपटीने बांधले. कोणत्याही प्रकारची हालचाल केल्यास थेट गोळ्या घालण्याची धमकी देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांना दिली होती. दरोडा वेळी रिलायन्स ज्वेलर्समधून पलायन करणाऱ्या एका ग्राहकावर गोळीबारदेखील केला होता. त्यानंतर दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने लुटून पलायन केले होते.

दरम्यान, दरोडेखोरांनी वापरलेली दरोड्यातील कार रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसे गावात सोडून दुसऱ्या कारमधून पलायन केले असल्याचे देखील समजते. ही कार ताब्यात घेण्यासाठी जिल्हा पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या दरोडेच्या पार्श्वभूमीवर दरोडेखोरांच्या शोधासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments