
अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या बोल्ड लूकसाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. नुसरतने ‘किटी पार्टी’ या मालिकेतून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर तिने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘जय संतोषी मां’ या चित्रपटामधून केली होती. पण, या चित्रपटातून तिला फारशी ओळख मिळवता आली नाही. पाच वर्षे संघर्ष केल्यानंतर नुसरतला एकता कपूरच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.








