हलदहिवडी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत दमदार कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सांगोला | प्रतिनिधी : श्री. लक्ष्मणराव येडगे शिक्षण प्रसारक मंडळ, हलदहिवडी संचलित हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय कुस्ती आणि तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध वजनगटांत विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत आपल्या क्रीडा कौशल्याची चमक दाखवली असून, यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कुस्ती स्पर्धेत चार विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
तालुकास्तरीय शालेय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा २०२६-२७ मध्ये हलदहिवडी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली.
१४ वर्षे वयोगट मुली :
कुमारी आर्या राजेंद्र होवाळ (इयत्ता ८ वी) हिने ५० किलो वजनगटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.
१९ वर्षे वयोगट मुली :
कुमारी हर्षदा बापू होवाळ (इयत्ता १२ वी) हिने ७६ किलोवरील वजनगटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
१४ वर्षे वयोगट मुले :
कुमार शुभम बापू होवाळ (इयत्ता ७ वी) याने ३५ किलो वजनगटात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
१७ वर्षे वयोगट मुले :
कुमार युवराज अनिल पाटील (इयत्ता ११ वी) याने ६० किलो वजनगटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.
या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना श्री. शिवाजी चव्हाण सर, श्री. गणेश तांबे वस्ताद, श्री. राजेंद्र होवाळ आणि श्री. बापू होवाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
तायक्वांदो स्पर्धेतही तीन विद्यार्थ्यांचे यश
सांगोला येथील क्रीडा संकुलात आयोजित तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेतही हलदहिवडी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
इयत्ता १२ वीतील कुमारी हर्षदा बापू होवाळ हिने १९ वर्षे वयोगटातील ६८ किलोवरील वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला.
कुमार युवराज अनिल पाटील याने १७ वर्षे वयोगटातील ४५ ते ५९ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला.
तर कुमारी सोनिया समाधान गायकवाड हिने १७ वर्षे वयोगटातील ४४ ते ४६ किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला.
या तिन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना प्रशालेचे सहशिक्षक श्री. शिवाजी चव्हाण सर आणि श्री. आबा वाघमोडे सर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून नियमित सराव व मेहनत करून घेतल्याने त्यांना हे यश मिळाले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा प्रा. अपर्णा येडगे, प्रशालेचे प्राचार्य श्री. रामचंद्र जानकर, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
हलदहिवडी, धायटी व शिरभावी परिसरातील ग्रामस्थांकडूनही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
