Saturday, September 12, 2026
Homeफलटणबरड जि.प. गटाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या अध्यक्षा वैशाली कांबळे यांची शाळेला...

बरड जि.प. गटाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या अध्यक्षा वैशाली कांबळे यांची शाळेला भेट

विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रेरणादायी मार्गदर्शन; शाळेच्या गुणवत्तेबाबत व्यक्त केले समाधान

फलटण : प्रतिनिधी. बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तसेच बरड जि.प. गटाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या अध्यक्षा माननीय सौ. वैशाली कांबळे मॅडम यांनी  शाळेला सदिच्छा भेट देऊन शाळेतील शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली.

शाळा भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तसेच शाळेतील गुणवत्तापूर्ण वातावरणाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अभ्यासाबाबत तसेच भविष्यातील ध्येयांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने शिक्षण घेत सातत्याने प्रगती करावी, असे प्रेरणादायी विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, शैक्षणिक प्रगती आणि शिक्षकांचे प्रयत्न पाहून वैशाली कांबळे मॅडम यांनी शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत शाळेचे व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. तसेच शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

त्यांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या वतीने सौ. वैशाली कांबळे मॅडम यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments