मुंबई : २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होण्याची सक्ती रद्द करून त्यांना TET पात्रतेतून कायमस्वरूपी सूट द्यावी, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.
तमिळनाडू शासनाने २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET पात्रतेतून सूट देण्याबाबत ठराव पारित करून तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही तातडीने ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने केली आहे.
TET परीक्षेची सक्ती झाल्याने २३ ऑगस्ट २०१० पूर्वी सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसमोर निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. अनुभवी शिक्षकांचे सेवास्थैर्य कायम ठेवून त्यांना योग्य संरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेची प्रमुख मागणी
- २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त प्राथमिक शिक्षकांना TETची सक्ती रद्द करावी.
- संबंधित शिक्षकांना TET पात्रतेतून कायमस्वरूपी सूट द्यावी.
- शिक्षकांचे सेवास्थैर्य अबाधित ठेवावे.
- तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने ठराव पारित करावा.
- केंद्र सरकारकडे आवश्यक प्रस्ताव पाठवून प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा.
कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यचे राज्याध्यक्ष आकाश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, सरचिटणीस प्रा. पालवे सर तसेच विभागीय कार्याध्यक्ष/जिल्हाध्यक्ष संजय दिनकर खरात यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या या प्रश्नासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
