दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या फलटण बंदचे आवाहन; सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून आंदोलनाची सुरुवात

0
8
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या फलटण बंदचे आवाहन; सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून आंदोलनाची सुरुवात

फलटण | प्रतिनिधी. दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, फलटणच्या वतीने शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीचे सुभाष गायकवाड, संदीप भाऊ काकडे, तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि फलटणमधील अनेक सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती देण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फलटण शहरातील व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच उद्या (दि. २३ जुलै) सकाळी नेमके ९.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जमावे. तेथून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असून, सर्वांनी वेळेत उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी, फलटणच्या वतीने करण्यात आले आहे.