Wednesday, September 2, 2026
Homeसाताराजिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतवडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांची...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतवडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी; ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतवडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी; ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग

परतवडी | प्रतिनिधी :- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, परतवडी येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्तिमय दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शाळेपासून गावात काढण्यात आलेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची पारंपरिक वेषभूषा परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या घोषात आणि अभंगांच्या सुरावटीत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

या दिंडीमध्ये गावातील ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे शाळा आणि गाव यांच्यातील सामाजिक व सांस्कृतिक बंध अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वारकरी परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, संतांचे विचार आणि संस्कार त्यांच्या मनात रुजावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी आदरणीय लक्ष्मण पिसे साहेब, मलवडी बीटचे विस्ताराधिकारी मा. गंबरे साहेब तसेच तोंडले केंद्राच्या केंद्रप्रमुख मा. झणझणे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापिका स्वाती साळवे, रुपाली पवार मॅडम आणि विशेष शिक्षक सूर्यकांत सुस्तरफोड यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने केले. दिंडी यशस्वी करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध सहभाग आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा भक्तिमय दिंडी सोहळा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.

भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम परतवडी गावासाठी प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments