Tuesday, September 1, 2026
Homeफलटणडराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व...

डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप

डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप

फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखी सोहळ्याच्या पावन निमित्ताने डराडो (DARADO NGO) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शुक्रवार, दि. 17 जुलै 2026 रोजी फलटण येथे वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले.

सकाळी 10.00 वाजल्यापासून सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत अखंडपणे सुरू असलेल्या या सेवा उपक्रमाला वारकरी माऊलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम…” “ज्ञानोबा-तुकाराम”… या अखंड गजरात भक्तिमय वातावरणात हा उपक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. “वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून संस्थेच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण दिवस निस्वार्थपणे सेवा बजावली.

या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे डराडो संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात व ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी सर्व देणगीदार, स्वयंसेवक तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी संस्थेचे स्वयंसेवक फुले, श्रीमती शिंदे, नाळे, शिंदे, सोनावणे बंधू, अडसूळ, सनी, पारसे, खरात, कणसे तसेच इतर सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकत्रित सहकार्यामुळे हा सेवा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपत भविष्यातही अशाच प्रकारचे लोकहिताचे व समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments