Tuesday, August 25, 2026
Homeसाताराशाळा बंद आंदोलनाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सरकारने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी असे...

शाळा बंद आंदोलनाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सरकारने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी असे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे धनसिंग सोनावणे, संजय खरात

शाळा बंद आंदोलनाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सरकारने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी – धनसिंग सोनावणे, संजय खरात

सातारा | प्रतिनिधी :- शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलै रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलन मोर्चाला जिल्हाभरातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी केले. या मोर्चात माण तालुक्यासह विविध तालुक्यांतील शेकडो शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे नेते धनसिंग सोनावणे आणि संजय दिनकर खरात यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधित करताना शासनाने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. शिक्षकांवर वाढत चाललेला प्रशासकीय ताण कमी करून त्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी शिक्षकांची एकजूट हीच आंदोलनाची खरी ताकद असल्याचे सांगत, राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद शासनाला निश्चितच निर्णय घेण्यास भाग पाडेल, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, माण तालुक्यातील शेकडो शिक्षकांनी मोर्चात सहभागी होऊन आंदोलनाला भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल माण तालुका   कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. शिक्षकांच्या एकजुटीमुळे सातारा येथील मोर्चा प्रभावी ठरल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments