
NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेत प्रांजळ येळेचे दुहेरी यश; जिल्ह्यात तिसरा क्रमांक
फलटण, प्रतिनिधी : फलटण येथील व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थिनी प्रांजळ दीपक येळे हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता ८ वी मधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये NTC प्रवर्गातून जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवत तिने मानाचे यश संपादन केले आहे. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्येही ती शिष्यवृत्तीधारक ठरली आहे.
प्रांजळच्या या उज्ज्वल यशामागे तिची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. तिला सुशांत घाडगे सर व मेघा घाडगे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल व्हिजन अकॅडमी, फलटण तसेच सर्व पालक व विद्यार्थ्यांनी प्रांजळचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
याचप्रमाणे खरात सर, पवार मॅडम आणि कुलाळ मॅडम यांनीही प्रांजळच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. प्रांजळच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.










