Monday, August 17, 2026
Homeसातारासातारा जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला; नवजात २४ तासांत ८६ मिमी, कोयना...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला; नवजात २४ तासांत ८६ मिमी, कोयना धरणात पाण्याची आवक वाढली

सातारा | प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून गेल्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात २ हजार ५५६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून १४.२४ टीएमसी इतका झाला आहे.

मागील आठवड्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, नवजा आणि कोयना खोऱ्यात जोरदार पाऊस झाला होता. पाटण तालुक्यातील पाथरपूंज येथेही विक्रमी पावसाची नोंद झाली होती. सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत झालेल्या पावसामुळे खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले.

त्यानंतर सलग तीन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, रविवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पश्चिम भागात कोयना, महाबळेश्वर, नवजा आणि परिसरात चांगला पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या इतर भागांतही अधूनमधून सरी कोसळत असल्याने खरीप पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास जलसाठ्यात आणखी भर पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments