Friday, September 11, 2026
Homeफलटणफलटणात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी १४ जून रोजी मुलाखती; इच्छुक शिवसैनिकांना आवाहन

फलटणात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी १४ जून रोजी मुलाखती; इच्छुक शिवसैनिकांना आवाहन

फलटणात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी १४ जून रोजी मुलाखती; इच्छुक शिवसैनिकांना आवाहन

फलटण | प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण-कोरेगाव आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघांसाठी शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदांपर्यंतच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्यांसाठी इच्छुक शिवसैनिकांच्या मुलाखतींचे आयोजन रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी फलटण येथील कोळकी परिसरातील अनंत मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासह तळागाळातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार असून, माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील मुलाखती दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत पार पडतील.
या मुलाखती शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख सौ. रेश्माताई जगताप तसेच माढा लोकसभा युवा सेनेचे संपर्कप्रमुख सुजित खुर्द यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिवसेना संघटनेतील विविध पदांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहून मुलाखत प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्वाची निवड करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
यासंदर्भातील माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments