Thursday, September 10, 2026
Homeफलटणप्रभाग क्रमांक ४ मध्ये महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच एनसीएमसी कार्ड सुविधा

प्रभाग क्रमांक ४ मध्ये महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच एनसीएमसी कार्ड सुविधा

फलटण | प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाच्या महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या एसटी प्रवास सवलत योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक पप्पूभाई तानुद्दीन शेख यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ४ मधील महिला व ज्येष्ठ नागरिकांना केवळ २२० रुपयांत एनसीएमसी (NCMC) कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कार्ड तयार करून देण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार १२ वर्षांवरील सर्व महिला प्रवासी तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक असून अनेक नागरिकांना कार्ड काढताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

कार्ड नोंदणीसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. कार्डचे शुल्क फक्त २२० रुपये ठेवण्यात आले असून नागरिकांच्या सोयीसाठी घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे प्रभागातील महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या एसटी प्रवास सवलतीचा लाभ सहज मिळणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक पप्पूभाई शेख यांनी केले आहे.

नोंदणी कालावधी

९ जून ते १२ जून २०२६

वेळ

सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी संपर्क

  • नितिकेश राऊत – ९९७०५६५०७२ ‘
  • साजिब आतार – ७०२०६६०५८१
  • एकनाथ चवंडके – ९३२५२९७७३७
  • अखिल डांगे – ९३०७६३२२६३

,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments