Friday, September 11, 2026
Homeमहाराष्ट्रवादळी वारे नंतर  नगर परिषद अकलूजच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये तातडीची पाहणी

वादळी वारे नंतर  नगर परिषद अकलूजच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये तातडीची पाहणी

मुसळधार पावसानंतर नगर पंचायत अकलूजच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये तातडीची पाहणी

अकलूज प्रतिनिधी : अकलूज शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर परिषद अकलूजच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही नागरिकांच्या घरांवर झाडे पडली, तर अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.या घटनेची तात्काळ दखल घेत नगरसेविका मनिषा ताई मोहन तिकोटे यांनी संबंधित भागाची पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्मा ताई आडगळे यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली. तसेच वायरमन, सीओ साहेब, तलाठी आणि नगरपरिषदेचे कर्मचारी यांना घटनास्थळी बोलावून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.पडलेली झाडे हटविणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नगरसेविका मनिषा ताई तिकोटे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कामांचा आढावा घेतला व नागरिकांना धीर दिला.दरम्यान, नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी उद्या तलाठी यांना बोलावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. “प्रभाग क्रमांक १० हे माझे कुटुंब असून नागरिकांच्या सुख-दुःखात मी कायम त्यांच्या सोबत आहे,” असे मनिषा ताई  तिकोटे यांनी सांगितले.तसेच मोहिते पाटील कुटुंब आणि नगरपरिषद नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी असून कोणालाही काळजी करण्याचे कारण नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments