Maharashtra Rain Updates: केरळमध्ये मान्सून (Monsoon Alert) दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. पुढील 48 तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, विदर्भातील मान्सूनसाठी 15 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. (Monsoon arrives in India through Kerala)
पुढील 2-3 दिवसात मोसमी वारे महाराष्ट्रातील काही भाग व्यापू शकतात, अशी भारतीय हवामान विभागाची माहिती आहे. पुढील 2-3 दिवसांत गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, सोबतच तामिळनाडू, कर्नाटक, बंगालचा उपसागराचा काही भाग आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती आहे.
यंदा मान्सूनचा प्रवास 3 दिवस उशिराने- (Monsoon Arrives In India)
यंदा मान्सूनचा प्रवास 3 दिवस उशिराने, मान्सून केरळात 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र यंदा तो 3 जून रोजी दाखल झाला आहे. याचदरम्यान, हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सून धडकला असून यंदा तीन दिवस उशिराने आला आहे. मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे. कोकणात सुद्धा 48 तासांत पाऊस दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
पुढील 48 तासांत कोकणात पाऊस- (Maharashtra Rain Updates)
विदर्भात तापमान 40 ते 42 अंशाचा घरात राहील. 10 जून नंतर तापमान कमी होईल. केरळला सामान्यतः एक जूनच्या सुमारास दाखल होतो. आता तीन दिवस उशिरा केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील 48 तासांत दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये कोकण मधला भाग तिथे पावसाचा अंदाज आहे, असं प्रवीण कुमार यांनी सांगितले.
विदर्भात पुढील काही दिवस वादळीवाऱ्याचा मध्यमस्वरूप आता पाऊस- (Maharashtra Rain Updates)
मान्सूनच्या अनुषंगाने परिस्थिती अनुकूल आहे. विदर्भात साधारणतः 15 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होतो. विदर्भात पुढील काही दिवस वादळीवाऱ्याचा मध्यमस्वरूप आता पाऊस होईल. मात्र आता येणारा पाऊस हा अवकाळीच असेल, कारण मान्सूनच्या अनुषंगाने अजून विदर्भात अनुकुल वातावरण निर्माण व्हायचे आहे, असं प्रवीण कुमार म्हणाले.
वर्धा, चंद्रपूर, यवतमाळला ऑरेंज अलर्ट- (Rain In Maharashtra)
वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ठेवण्यात आला आहे. मध्यम स्वरूपाच पाऊस आणि वादळी वारा असणार आहे. पण अवकाळी पाऊस असेल, हा मान्सून पूर्व पाऊस नसेल. विदर्भाला मान्सूनसाठी अजून प्रतीक्षा कायम असणार आहे. मात्र 10 जूननंतर परिस्थितीच्या अनुषंगाने याचा अंदाज घेता येईल, अशी माहिती प्रवीण कुमार यांनी दिली.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
संबंधित बातमी:
आणखी वाचा










