Vidhan Parishad Election 2026: साताऱ्यातील शिवसेनेमध्ये (Shiv Sena) अंतर्गत धुसफुस अजूनही कायम असल्याचे चित्र असून, दोन बड्या नेत्यांमधील हा वाद आता थेट पक्षाचे मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दरबारात पोहोचला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळापासून आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यात तीव्र मतभेद समोर आले होते. हाच वाद आता आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर अधिक उफाळून आला असून, याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Vidhan Parishad Election 2026: काय आहे नेमका वाद?
जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान, शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी भाजपमधून (BJP) उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नीच्या विजयासाठी पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला होता. तेव्हापासून महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या संपूर्ण वादानंतर फलटण (Phaltan) येथील सभेपूर्वी आमदार महेश शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादानंतरची ही या दोन्ही नेत्यांची पहिलीच भेट होती.
Vidhan Parishad Election 2026: उपमुख्यमंत्र्यांसमोर वाचला अन्यायाचा पाढा
या महत्त्वाच्या भेटीदरम्यान आमदार महेश शिंदे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर वाचला. “मी कधीही पक्षाच्या किंवा तुमच्या विरोधात गेलो नाही आणि तसे कोणतेही वक्तव्य केले नाही,” अशी सफाई महेश शिंदे यांनी दिली. तसेच, “पालकमंत्री शंभूराज देसाई हे जाणीवपूर्वक माझ्याविरोधात राजकारण करत असून, तुम्हीच आता या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे,” अशी थेट मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
Vidhan Parishad Election 2026: महेश शिंदेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांचा कानाडोळा
आमदार महेश शिंदे यांनी तक्रार केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादात पडणे टाळले. त्यांनी महेश शिंदेंच्या राजकीय तक्रारीकडे दुर्लक्ष करत केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मतदारसंघातील कामाकडे लक्ष देण्याचा सल्ला देत महेश शिंदेंच्या वक्तव्यावर कानाडोळा केला.
Vidhan Parishad Election 2026: उदय सामंतांची टीका
उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सातारा जिल्ह्यातील फलटण येथे शिवसेनेची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. उदय सामंत यांच्या या जाहीर टीकेमुळे साताऱ्यातील शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. साताऱ्यातील दोन्ही नेत्यांमधील मतमतांतरांमुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत पक्षांतर्गत मोठ्या बंडाळीची किंवा मतफुटीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साताऱ्यातील या राजकीय धुसफुसीचा फटका महायुतीला बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Vidhan Parishad Election 2026: निवडणूक कार्यक्रम जाहीर
अधिसूचना जारी : 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
अर्जाची छाननी : 2 जून
अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.
मतमोजणी : 22 जून
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा









