Saturday, September 12, 2026
Homeफलटणकोळकी येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात

कोळकी येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात

कोळकी येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात

फलटण : भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा सातारा जिल्हा पूर्व व महिला शाखा फलटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने कोळकी येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सामाजिक सभागृहात धम्म उपासिका शिबिरास उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शिबिराच्या प्रारंभी उपस्थितांनी आपल्या आदर्शांचं पूजन करून त्रिसरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची मंगलमय वातावरणात उपासिका शिबिराची सुरुवात झाली.राज्याच्या संघटक, बारा जिल्हा च्या प्रभारी आयुनि रत्नप्रभा राजश्री दिपक सरवदे, सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुजाता गायकवाड, केंद्रीय शिक्षिका सुवर्णा ओहाळे यांच्या हस्ते उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले.

या शिबिरात भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आयुनि सुवर्णा ओव्हाळे यांनी बौद्ध धम्मातील वंदना पद्धती, त्रिसरण व पंचशील यांचे सखोल विश्लेषण केले. त्यांनी पाली भाषेतील अचूक उच्चारणासह मराठी अर्थ समजावून सांगत उपस्थितांना प्रत्यक्ष सहभागातून शिकण्याची संधी दिली. विशेषतः पंचांग प्रणामाची पद्धत प्रत्यक्षिकाद्वारे स्पष्ट करून त्यामागील आध्यात्मिक व व्यावहारिक महत्त्व त्यांनी उलगडले. यासोबतच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञांचा उल्लेख करत, त्या आचरणात आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था असून संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतभर विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये महिला उपासिका शिबिर हे खूप महत्त्वाचे आहे शिबीर मानले जाते. त्यामुळे पुढील दहा दिवस अतिशय विनम्रपणे व लक्षपूर्वक धम्मातील विषय समजून घ्या. आयुनि सुवर्णा ओव्हाळे या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सोप्या पद्धतीने धम्म शिकवत आहेत. पुढील दहा दिवस विविध विषयांवर मार्गदर्शन होणार असून सर्वांनी नियमित सहभाग घेऊन शिबिराचा पूर्ण लाभ घ्यावा.” भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आयुनि सुवर्णा ओव्हाळे ताई धम्मप्रचारासाठी समर्पित भावनेने काम करत आहेत. हे कार्यही त्यांनी अधोरेखित करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.सातारा जिल्ह्याच्या महिला आघाडीचे अध्यक्ष सुजाता गायकवाड म्हणाल्या, भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था असून या संस्थेच्या माध्यमातून विविध शिबिरांचा आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षभरापासून उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्याला आता यश आले आहे. तेव्हा सर्व उपासिकांनी वेळेत येऊन धम्म समजून घ्यावा आणि तसे आचरण करावे. भारतीय बौद्ध महासभेने चांगले केंद्रीय प्रशिक्षक आपल्याला दिलेले आहेत त्यांच्याकडून विविध विषय आपण समजून घ्या.

माजी तालुका अध्यक्ष आयु. शिवाजी सावंत यांनी आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करताना उपासक ते विपश्यना साधक असा स्वतःचा प्रवास मांडला. धम्मकार्यामध्ये सातत्य व शिस्त आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. योग्य मार्गदर्शन आणि निष्ठेने साधना केल्यास प्रत्येक व्यक्ती श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत या अवस्थांमधून जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना येणारी कोणतीही शंका मनात न ठेवता प्रश्न विचारण्याचे व विषय सखोल समजून घेण्याचे आवाहन केले. “धम्म समजून घेण्यासाठी नियमित उपस्थिती आणि सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा आयुनि रंजना रणवरे मॅडम यांनी उपस्थित आमचे स्वागत केले. त्यासोबत या शिबिराचे प्रास्ताविक करून संपूर्ण रुपरेषा बौद्ध उपासिकांना समजावून सांगितली.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा सातारा जिल्हा अध्यक्षा आयुनि सुजाता गायकवाड, फलटण तालुका अध्यक्षा आयुनि रंजना रणवरे, राज्याचे ऑडिटर आयु. अरुण गायकवाड, तालुका कोषाध्यक्ष आयु. राजकुमार रणवरे, माजी सरचिटणीस आयु. भिकू भोसले यांसह अनेक पदाधिकारी व धम्मबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपासिका शिबिरासाठी रजनी सुहास माने, आरती विशाल पाटील, चित्रा विठ्ठल गायकवाड, श्रेया नितीन साळवे, हर्षदा गौतम काकडे, प्रफ्युलता भीमराव लोंढे, परिमिता सुनिल कांबळे, मनिषा जगताप,विद्या खंदारे, कुसुम गुलाबराव माने, प्राजक्ता सागर काकडे, मयुरी सुशिल काकडे, कांताताई शंकर काकडे, सुप्रिया बाळासाहेब माने या उपासिका शिबिरात बसल्या आहेत.

दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये धम्माचे विविध पैलू, आचार-विचार, साधना आणि बौद्ध जीवनपद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार असून, परिसरातील महिलांमध्ये याबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments