नितीन नबीन यांचा कॉलम: सुरक्षा, सन्मान, स्वाभिमान आणि आता भागीदारी‎

0
3
नितीन नबीन यांचा कॉलम:  सुरक्षा, सन्मान, स्वाभिमान आणि आता भागीदारी‎




‎‎‎‎‎‎‎‎‎‎हा प्रसंग निश्चितच ऐतिहासिक आहे. आजपासून भारतीय‎संसदेच्या तीन दिवसीय सत्रात एका युग परिवर्तनीय ‎विधेयकावर चर्चा होत आहे. हे विधेयक आपल्या‎विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मैलाचा‎दगड ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील‎आमच्या सरकारच्या या पुढाकाराला सर्व राजकीय‎पक्षांचा पाठिंबा मिळेल, अशी आशा आहे. ही आशा‎यासाठी आहे कारण हे विधेयक केवळ एक घटनात्मक‎प्रक्रिया नसून आपल्या समाजाच्या मूलभूत विचारांना नवी‎दिशा देणारे आहे. सप्टेंबर 2023 मध्ये ‘नारी शक्ती वंदन”‎अधिनियमाच्या रूपाने या प्रवासाचा श्रीगणेशा झाला‎होता. तो आता निर्णायक वळणावर आहे. हे अधिनियम‎सुनिश्चित करेल की, पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून‎देशाची सर्वोच्च पंचायत, संसद आणि सर्व‎विधिमंडळांमध्ये नारी शक्तीचा पूर्ण सहभाग असेल‎आणि धोरण निर्मितीत त्यांचा आवाज एक तृतीयांश‎भागीदारीसह मजबुतीने सामील होईल.‎ पंतप्रधान झाल्यापासूनच नरेंद्र मोदी यांनी महिलांची‎सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमान आपल्या धोरणांच्या‎केंद्रस्थानी ठेवला आहे. महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचे‎सक्षमीकरण ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे.‎आमच्या सरकारने महिलांच्या आयुष्यातील प्रत्येक‎टप्प्यावर त्यांना सक्षम करण्यासाठी योजनांचे एक व्यापक‎जाळे तयार केले आहे:‎ बेटी बचाओ, बेटी पढाओ : मुलींकडे पाहण्याचा‎दृष्टिकोन बदलला, त्यांचा आत्मविश्वास आणि संधी‎दोन्ही वाढल्या.‎
मुद्रा योजना : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी‎बनवले.‎
प्रधानमंत्री आवास योजना: घरच्या लक्ष्मीला घराचा ‎‎मालकी हक्क मिळाला.‎
सुकन्या समृद्धी योजना : मुलींचे भविष्य‎आर्थिकदृष्ट्या सुरक्षित झाले.‎
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: महिलांची धुरापासून‎सुटका झाली आणि जीवनमान सुधारले.‎
मिशन इंद्रधनुष : लसीकरणामुळे माता आणि‎बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली.‎
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना : गरोदर मातांना पोषण ‎‎आणि आर्थिक आधार मिळाला.‎
ट्रिपल तलाक : मुस्लिम महिलांची अन्यायातून सुटका ‎‎झाली आणि त्यांचा आत्मसन्मान वाढला.‎
नळाद्वारे पाणी : घरापर्यंत पाणी पोहोचल्याने महिलांचे ‎‎जीवन अधिक सुसह्य झाले.‎
लखपती दीदी : महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या ‎‎आणि आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकले.‎
ही सर्व उदाहरणे आमच्या सरकारची महिला ‎‎सक्षमीकरणाप्रती असलेली अतूट कटिबद्धता सिद्ध‎करतात. आता धोरण निश्चितीमध्ये महिलांची सक्रिय ‎‎भूमिका असावी, यासाठी पंतप्रधान ”नारी शक्ती वंदन‎अधिनियम” घेऊन आले आहेत. हे केवळ आश्वासन‎नाही, तर त्यांची स्पष्ट दृष्टी आहे की 2029 पासून संसदीय‎प्रणालीमध्ये महिलांची 33 टक्के उपस्थिती असावी.‎ बारीक विचार केला तर लक्षात येईल की, हा केवळ‎संसदेत महिलांची संख्या वाढवण्याचा वरवरचा प्रयत्न‎नाही. ही आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, दार्शनिक‎आणि ऐतिहासिक परंपरेतील सुधारणा आहे. ज्या सनातनी‎विचारप्रणालीच्या पायाभरणीत गार्गी, मैत्रेयी, अरुंधती,‎अपाला, घोषा, विश्ववारा, सुलभा, सीकता आणि‎शाश्वती यांसारख्या अनेक ऋषी-स्त्रियांनी वेद संहिता‎रचण्यापासून जीवनाच्या विविध क्षेत्रांत आपल्या‎बुद्धिमत्तेचा परिचय दिला, हा त्याच परंपरेचा सन्मान आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये अहिल्याबाई होळकर‎यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने लोककल्याणाचे‎आदर्श ठेवले, तर झाशीच्या राणीने मातृभूमीसाठी‎दिलेल्या बलिदानाने जागतिक इतिहासात भारतीय नारीच्या‎त्यागाचे उदाहरण दिले.‎
आजच्या भारताच्या निर्मितीतही आपल्या मुलींचे योगदान‎अतुलनीय आहे. सावित्रीबाई फुलेंच्या‎समाजसुधारणेपासून ते डॉ. आनंदीबाई जोशींच्या‎वैद्यकीय संघर्षापर्यंत आणि ‘मिसाईल वुमन” टेसी थॉमस‎यांच्या वैज्ञानिक पराक्रमापर्यंत— प्रत्येक क्षेत्रात महिलांनी‎स्वतःला सिद्ध केले आहे. खेळाच्या मैदानात पी.व्ही.‎सिंधू, मेरी कोम, मिताली राज आणि सायना नेहवाल‎यांनी तिरंग्याची छान वाढवली, तर संगीत विश्वात लता‎मंगेशकर आणि आशा भोसले यांसारख्या स्वरसम्राज्ञींनी‎आपली मोहोर उमटवली आहे. संसदेत महिलांसाठी जागा‎आरक्षित करण्याचा हा निर्णय वैदिक प्रतिष्ठा आणि‎आधुनिक प्रगतीचा सुंदर संगम आहे. यात ‘सबका साथ,‎सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास” ही‎पवित्र भावना सामावलेली आहे. हे विधेयक कोट्यवधी‎माता-भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन आहे.‎कुटुंब आणि समाजाच्या उभारणीसाठी महिलांनी स्वतःला‎झिजवले. या बदलाचा क्रांतिकारक परिणाम आपल्या‎ग्रामीण भारतावर होईल, जिथे महिला आता नेतृत्वाच्या‎भूमिकेत दिसतील. ही सक्रिय भागीदारी सामाजिक‎रूढींना तोडेल आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी असे वातावरण‎तयार करेल, जिथे मुली केवळ स्वप्ने पाहणार नाहीत, तर‎ती साकार करण्याचे सामर्थ्य आणि कायदेशीर‎अधिकारही त्यांच्याकडे असतील.‎ या विधेयकाबाबत सरकारची नियत किती शुद्ध आहे,‎याचा अंदाज यावरूनच येतो की, पंतप्रधानांनी स्पष्ट केले‎आहे की हा कोणत्याही एका पक्षाचा अजेंडा नसून‎सर्वांच्या प्रयत्नांचा विजय आहे. याचे श्रेय त्या सर्व पक्षांना‎जाते जे गेल्या तीन-चार दशकांपासून या दिशेने काम‎करत आहेत. आपली संसद हे लोकप्रतिनिधींचे मंदिर‎आहे. देशातील जनता आपल्या प्रत्येक कृतीचे बारकाईने‎निरीक्षण करत असते. माननीय खासदारांना नम्र विनंती‎आहे की, त्यांनी राष्ट्राची भावना समजून घ्यावी. आपण‎पक्षीय सीमांच्या पलीकडे जाऊन नारी शक्तीच्या‎सामर्थ्यासाठी आपले समर्थन द्यावे, ही काळाची गरज‎आहे. हा सामूहिक प्रयत्नच सुनिश्चित करेल की‎भविष्यातील भारत केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही, तर‎सामाजिक न्याय आणि नारी सन्मानाच्या बाबतीतही‎जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम असेल.‎ संसदीय प्रणालीत महिलांची‎33 टक्के उपस्थिती असावी‎नारी शक्ती वंदन अधिनियम हे केवळ‎आश्वासन नसून पंतप्रधानांची एक स्पष्ट‎दृष्टी आहे. 2029 पासून संसदीय प्रणालीत‎महिलांची 33 टक्के उपस्थिती असावी. त्या‎सशक्त व्हाव्यात. धोरण निश्चितीमध्ये‎त्यांची भूमिका प्रभावी व्हावी. त्या देशाचा‎बुलंद आवाज बनाव्यात, हा उद्देश आहे.‎



Source link