
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल ९९.१०% — ११२ पैकी १११ विद्यार्थी उत्तीर्ण
फलटण, जाधववाडी (दि. १६ एप्रिल २०२६):
फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल (CBSE) ने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत भव्य यश संपादन केले असून शाळेचा निकाल तब्बल ९९.१०% इतका लागला आहे. परीक्षेस बसलेल्या ११२ विद्यार्थ्यांपैकी १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशामध्ये कु. तुलसी बाळासाहेब जठार हिने ९७.६% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कु. पूर्वा पराग घनवट आणि रुद्रप्रताप जितेंद्र साळुंखे (९७%) यांनी संयुक्तरीत्या मिळवला. तृतीय क्रमांक शिवम रविकिरण राऊत व कु. श्रावणी सोमनाथ पवार (९६.६%) यांनी संयुक्तरीत्या मिळवला.
शाळेच्या निकालातील विशेष बाब म्हणजे ११२ विद्यार्थ्यांपैकी ८५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३२ इतकी आहे.
या यशामागे शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मराठी विषयासाठी रुबिना बागवान, हिंदीसाठी शीतल भोसले, इंग्रजीसाठी प्रीती एकल, गणितासाठी कै. तुकाराम शेलार, विज्ञानासाठी मयुरा फणसे, नूतन खेडकर व सुनिता नाईक-निंबाळकर, समाजशास्त्रासाठी अर्चना काटकर व वर्षा खोमणे, तसेच AI/IT साठी दीपज्योती दंडिले, चांदणी कदम व आयेशा पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, तसेच संस्थेचे पदाधिकारी, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्या मिनल दिक्षित, उपप्राचार्या स्नेहल भोसले, पर्यवेक्षिका प्रियांका जठार व अर्चना काटकर, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








