Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार

0
2


Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा,  देसाईंवर प्रहार

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाच जिल्हा परिषद सदस्यांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्यानं सत्ता भाजपनं मिळवली. भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष झाल्या तर राजू भोसले उपाध्यक्ष झाले.  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत गंभीर आरोप केले आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जात आहे,” असा घणाघात गोरेंनी केला. पालकमंत्री कालपासून विनाकारण आकांडतांडव करत आहेत. मागेपुढे पाच गाड्यांचा ताफा घेऊन फिरणे आणि पोलिसांची हरेसमेंट करणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. चौकात पोलीस दिसला नाही तर त्याला सस्पेंड करण्याच्या धमक्या दिल्या जातात. साक्षात पोलीस अधीक्षकांशी  बोलताना सुद्धा ते एखाद्या घरगड्याशी बोलल्यासारखे वागतात, हे अत्यंत निंदनीय आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांची ही निवडणूक होती, त्यात पालकमंत्र्यांना आत जाण्याची काय गरज होती?” असा सवाल गोरेंनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर कधीही अशा पद्धतीने बैठक लागली नव्हती, मग कालच ती कशी लागली? असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारला.



Source link