शंकर मार्केट हल्ला प्रकरणी जखमी हिरणवाळे बंधूंना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट

0
3
शंकर मार्केट हल्ला प्रकरणी जखमी हिरणवाळे बंधूंना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट

फलटण : श्रीमंन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शंकर मार्केट परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या हिरणवाळे बंधूंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या हल्ल्यात जखमी झालेले अनिल हिरणवाळे व संतोष हिरणवाळे यांची त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, फलटणचे राजघराणे हिरणवाळे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. “तुमच्यावर ओढवलेले संकट हे केवळ तुमचे वैयक्तिक नसून संपूर्ण फलटणकरांचे आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच संबंधित पोलीस प्रशासनाने आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणीही त्यांनी व्यक्त केली. ऐतिहासिक फलटण शहरात कोणत्याही प्रकारची गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
फलटणची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कोणताही दबाव न मानता पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत आणि शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.