Wednesday, August 12, 2026
Homeसाताराविमान अपघातात वीर सुपुत्राचे दुःखद निधन; तरडगावचे विदीप जाधव यांना अनिकेतराजेंनी वाहिली...

विमान अपघातात वीर सुपुत्राचे दुःखद निधन; तरडगावचे विदीप जाधव यांना अनिकेतराजेंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली


फलटण :-  बारामती येथे बुधवारी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात फलटण तालुक्यातील तरडगाव येथील सुपुत्र व कै. अजितदादा पवार यांचे जवळचे अंगरक्षक कै. विदीप जाधव यांचे अपघाती निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण फलटण तालुक्यात शोककळा पसरली असून जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुःखद घटनेनंतर फलटण संस्थांचे युवराज नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी तरडगाव येथील जाधव कुटुंबीयांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी कै. विदीप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
श्रीमंत अनिकेतराजे यांनी कै. विदीप जाधव यांच्या पत्नी, मुले तसेच आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व या कठीण प्रसंगी त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी नाईक निंबाळकर राजघराणे जाधव कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारेल, अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता बापू अनपट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. विदीप जाधव यांच्या निधनाने एक निष्ठावान अंगरक्षक आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments